(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आदिवासी विद्यार्थ्यांचे गणवेश-पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख बँक खात्यात जमा - आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके | मराठी १ नंबर बातम्या
" />

आदिवासी विद्यार्थ्यांचे गणवेश-पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख बँक खात्यात जमा - आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके

मुंबई ( २१ जून २०१९ ) : आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज येथे दिली.

उईके म्हणाले, सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अपर आयुक्त, नाशिक, ठाणे विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळा तसेच अमरावती विभागातील काही प्रकल्पातील शाळा दिनांक १७ जून रोजी सुरु झाल्या असून शाळा सुरु झाल्याच्या दिनांकापासुन प्रवेश नुतनिकरण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर आयुक्तालयामार्फत डिबीटीची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक २१ जून पर्यंत एकूण १ लाख ३ हजार १९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ४९ कोटी ७० लाख ८९ हजार २०० रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

यावेळी उईके म्हणाले, अपर आयुक्त, नागपुर विभागातील संपुर्ण आश्रमशाळा तसेच अमरावती विभागातील न सुरु झालेल्या शाळा या दिनांक २७ जून २०१९ रोजी सुरु होणार आहेत. सदर विद्यार्थ्यांची डिबीटी रक्कम विद्यार्थ्यांच्या अग्रिम बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आवश्यक आहे (उदा. ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी) ज्या दिवशी प्रवेशित होतील त्या दिवशी त्यांना सदर योजनेचा लाभ हस्तांतरीत करण्यात येईल.

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांना अन्नधान्य, कडधान्य, इतर किराणा माल तसेच शैक्षणिक साहित्य व इतर वस्तुंचा पुरवठा करण्यासंदर्भात दिनांक १० मार्च २०१६ च्या शासन निर्णयान्वये कार्यपध्दती विहीत करण्यात आलेली आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य व इतर वस्तूऐंवजी थेट रक्कम देण्याबाबतचा निर्णय दि. ७ एप्रिल 2017 रोजीच्या पत्रान्वये घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागात एकुण ५०२ शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण १ लाख ८१ हजार ९१ विद्यार्थी प्रवेशित आहे.

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विभागामार्फत थेट लाभ आधार सलग्न बँक खात्यात पाठविण्यात आला. सदर डिबीटी ही योजना यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत ई-गव्हर्नरस अंतर्गत प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणालीमध्ये विद्यार्थ्याचा अर्ज शाळेमार्फत अद्यावत केला जातो. सदर अर्जाची पडताळणी प्रकल्प कार्यालयामार्फत केली जाते व आयुक्तालयामार्फत मंजूर विद्यार्थ्याच्या खात्यावर डिबीटी प्रणालीमार्फत लाभ दिला जातो. प्रकल्प व शासकीय आश्रमशाळास्तरावरुन विशेष मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत बँक खाते उघडण्यात आले. याप्रमाणे कार्यवाही करुन सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात डिबीटी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget