अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई ( १५ जून २०१९ ) : मराठी रंगभूमीसाठी राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहीले आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. आगामी काळात राज्य शासनाच्यावतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कलावंत मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा काल संध्याकाळी यशवंत नाट्य मंदीर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना जाहीर झाला होता. प्रकृती कारणास्तव ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि अखिल भारतील नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तावडे या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक नाडकर्णी यांच्या नाट्य समीक्षेने खऱ्या अर्थाने मराठी नाट्यरसीक नाट्यगृहांकडे वळला. मराठी नाटकांची वृत्तपत्रामध्ये अतिशय समर्पक वस्तुनिष्ठ व सडेतोड नाट्य समीक्षेमुळे मराठी रसिकांना मराठी नाटक कळू लागले.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget