राम नाईक यांचे 'चरैवेती चरैवेती' पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुस्तकाच्या विविध भाषेतील ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई ( २७ जून २०१९ ) : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे 'चरैवेती चरैवेती' हे पुस्तक आतापर्यंत 10 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. आता ब्रेल लिपीतील आवृत्तीमुळे ते दृष्ट‍िबाधीत दिव्यांगांनाही उपलब्ध होत आहे. फारसी, अरबी, जर्मन या भाषांमध्ये भाषांतरीत होऊन ते विदेशातही पोहोचले आहे. राम नाईक यांचा जीवन संघर्ष, खडतर परिस्थितीतील त्यांची वाटचाल आणि सर्वसामान्यांसाठीचे त्यांचे कार्य सांगणारे हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राम नाईक यांच्या 'चरैवेती चरैवेती' या पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ब्रेल लिपीतील आवृत्तीचे येथील के. सी. महाविद्यालयातील सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राम नाईक, शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार, मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडचे अध्यक्ष हेमंत टकले, सचिव एस. के. सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राम नाईक यांचे जीवन खडतर आणि संघर्षाचे राहीले आहे. एखादा व्यक्ती अतिव संघर्षातून कसा उभा रहातो हे त्यांच्या 'चरैवेती चरैवेती' पुस्तकातून पहायला मिळते. या पुस्तकाची आवृत्ती आता ब्रेल लिपीतून उपलब्ध झाल्याने दृष्ट‍िबाधीत दिव्यांगांनाही त्याद्वारे प्रेरणा मिळू शकेल. राम नाईक यांनी कुष्ठपिडीत, दिव्यांग, मच्छिमार अशा समाजातील विविध शेवटच्या घटकांसाठी मोठे कार्य केले. जे काम मिळेल ते उत्तम करायचे अशी राम नाईक यांची पद्धती राहिली आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या काळात मिळालेल्या विविध खात्यांमध्ये त्यांनी उत्तूंग कामगिरी केली, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाने मागील 5 वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिव्यांगांना घरकुले देण्यासंदर्भातील मोठी योजना घोषीत करण्यात आली आहे. दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अधिवेशनानंतर लवकरच बैठक घेऊ, असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

ब्रेल लिपीतून पुस्तक उपलब्ध झाल्याचा विशेष आनंद – राम नाईक

राम नाईक म्हणाले, मेहनत केल्यास आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. जीवनात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत पुढे चालत राहीलो. हे सर्व अनुभव लोकांना सांगावेत या प्रेरणेतूनच 'चरैवेती चरैवेती' हे पुस्तक लिहीले. देश-विदेशातील १० भाषांमध्ये आतापर्यंत हे पुस्तक भाषांतरीत झाले आहे. आता ब्रेल लिपीतून हे पुस्तक दृष्ट‍िबाधीत दिव्यांगांसाठी उपलब्ध होत असल्याचा विशेष आनंद आहे, असे ते म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राम नाईक यांचे पुस्तक समाजातील अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. आता ते ब्रेल लिपीतून उपलब्ध झाल्याने दृष्ट‍िबाधीत दिव्यांग व्यक्तींना आपले जीवन आनंदात जगण्याची प्रेरणा त्यातून मिळू शकेल, असे ते म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget