मुंबई उपनगरात संरक्षक भिंती उभारण्यासाठी निविदा काढणार - रवींद्र वायकर

मुंबई ( २५ जून २०१९ ) : मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने संरक्षक भिंती बांधण्यासाठी ई-निविदा काढली आहे. त्यानुसार कंत्राटदारास या संरक्षक भिंती बांधण्याचे काम देण्यात आले असून, भविष्यातील धोका टाळण्यासाठी आणि तातडीने संरक्षक भिंतीचे काम पुर्ण होण्यासाठी अल्प निविदा सूचना काढून काम सुरू करणार असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यामधील संरक्षण भिंतीच्या कामाबाबत सदस्य रमेश लटके यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यास उत्तर देताना वायकर बोलत होते.

वायकर म्हणाले, मुंबई उपनगरातील झोपडपट्टी डोंगराळ भागात असते. याठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी म्हाडाच्या पद्धतीनुसार ई टेंडरिंग काढण्यात येईल. हे ई टेंडरिंग तात्काळ काढून पुढील १० दिवसात ताबडतोब कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वायकर यांनी यावेळी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget