वाशीच्या मिनी सीशोअर-सागर विहारला जोडणारा पादचारी पूल कालमर्यादेत निष्कासित करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( २५ जून २०१९ ) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी येथील मिनी सीशोअर आणि सागर विहारला जोडणाऱ्या पादचारी पूल कालमर्यादेत पुर्णत: निष्कासित करण्याचे निर्देश संबंधित महानगरपालिकेस देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १० एम मधील मिनी सीशोअर आणि सागर विहारला जोडणारा पादचारी पुल कोसळल्याबाबत सदस्य मंदाताई म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संबंधित पूल बंद केल्यानंतरचे ट्रॅफिक वळविण्याकरिता योजना आखण्यात आल्या आहेत. तसेच पर्यायी रस्ता उपलब्ध करून त्यावर पार्किंगला बंदी करण्यात आली आहे. त्या रस्त्यावर बससेवा वाढविण्यात आली आहे. व्यापारी रस्त्यावर त्या रस्त्यापूरत्या मर्यादित फे-या व्हाव्यात या दृष्टीने कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

दरम्यान एका उपप्रश्नास उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर म्हणाले, सदर प्रकरणी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीसंदर्भात कार्यवाही सुरू आहे. सदर पुलाची दुरूस्ती करण्याकरीता कामाचे कार्यादेश ठेकेदारास देण्यात आले असून, संबंधित घटनेचा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती सागर यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री संदीप नाईक, नसिम खान यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget