(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा लक्षवेधी : घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानसभा लक्षवेधी : घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई ( २० जून २०१९ ) : मुंबई शहर आणि उपनगर येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित स्थळावरून ३ वाहने आणि ७७ सिलेंडर्स असे एकूण ४ लाख ६४ हजार १६३ किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

आज विधानसभेत मुंबई शहर व उपनगरात घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध विक्रीबाबत सदस्य तृप्ती सावंत यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना चव्हाण बोलत होते.

चव्हाण म्हणाले, मुंबई व उपनगर येथील पारशी आग्यारी, बँक ऑफ बडोदा कंपाउंड, सिमला हाऊस कंपाऊंड, वाळकेश्वर रोड, मलबार हिल या तीन ठिकाणी छापे टाकले असता घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक व डिलीव्हरी करणाऱ्या वाहनांमध्ये अवैधरित्या भारत गॅस कंपनी व हिंदुस्तान गॅस कंपनीच्या भरलेल्या एल.पी.जी. सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना आढळून आले. संबंधित आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून भारत पेट्रोलियम कंपनीचे प्रत्येकी २५ सिलेंडर असलेली २ वाहने व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे २७ सिलेंडर असलेले एक वाहन अशी तीन वाहने तसेच रिकामे व भरलेले असे एकूण ७७ सिलेंडर्स असा एकूण ४ लाख ६४ हजार १६३ इतक्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.

तसेच, असे प्रकार घडल्यास संबंधित एजन्सीवर पहिल्यांदा नफ्याच्या ४० टक्के दंड आकारला जातो. तर, दुसऱ्यांदा असे घडल्यास ६० टक्के दंड आकारण्यात येतो आणि तिसऱ्यांदाही त्याच एजन्सीकडून असे घडल्यास एजन्सी बंद करण्यात येते. याचबरोबर डिलीव्हरी बॉयला दिल्यानंतर आणि ग्राहकापर्यंत सिलेंडर पोहोचण्याच्या मधल्या प्रक्रियेत हे गुन्हे घडत असल्याने, ग्राहकांनीही सिलेंडर घेताना वजन करून घ्यावे. प्रत्येक डिलीव्हरी बॉयकडे वजन काटा असणे शासनाने बंधनकारक केले आहे. याचबरोबर पाईप लाईनमुळे मिळणारा गॅस हा स्वस्त असल्याने त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असून, लवकरच पाईप लाईनद्वारे गॅसचे वितरण करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

चव्हाण म्हणाले, मुंबई उपनगरात अवैध गॅस सिलिंडरची विक्री हॉटेल व्यावसायिक व फूटपाथवरील अनधिकृत व्यावसायिकांना पुरविण्यात येत असल्याच्या व घरगुती गॅस वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी तेल कंपन्यांना प्राप्त झाल्यास संबंधित गॅस वितरकांविरूद्ध मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईन नुसार कारवाई करण्यात येते. तसेच, गॅस सिलेंडरच्या अनधिकृत वापरास आळा बसावा म्हणून या विभागाकडून वेळोवेळी धाडी व तपासण्याची कार्यवाही करण्यात येते. गतवर्षात मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात एकूण ६४ गॅस एजन्सींच्या तपासण्या करण्यात आल्या असून अनियमितता आढळून आलेल्या नऊ एजन्सींविरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget