योगमुळे मानसिक- शारिरीक मजबुती - पंकजा मुंडे

मुंबई ( २१ जून २०१९ ) : योग एक प्रकारची उर्जा आहे. योगाच्या विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच चांगल्यापणाची भावना निर्माण होते. योग मानवी मनशक्तीला गतीमान करते, बौध्दिक पातळी सुधारते आणि भावनांना स्थिर ठेवून उच्च पातळीच्या एकाग्रतेमध्ये वाढ करण्यास मदत करते, असे ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

डोंगरी येथील निरिक्षण गृह, बालगृहातील मुलींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना केल्यानंतर माध्यम प्रतीनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

मुंडे म्हणाल्या, 21 जून रोजी संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात केली असून योग ही भारताची हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. नित्य योग साधना केल्याने शरीर निरोगी राहते. बाल वयापासूनच योग केल्यास त्याचा अधिक प्रमाणात लाभ मिळतो, त्यामुळे बालगृहात येऊन बालकांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांच्यासोबत योग साधना करुन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget