नाशिक : दूधभेसळ प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश

मुंबई ( २५ जून २०१९ ) : वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या दूध भेसळ संदर्भातील वृत्ताची अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागाचे प्रधान सचिव व आयुक्त यांना देण्यात आले आहेत.

दूधासारख्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित खाद्य पदार्थात भेसळ होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री रावल यांनी दिल्या आहेत.

नाशिक येथील सिडको भागात राहणाऱ्या नागरिकांना दुधात प्लास्टिकसदृश पदार्थ असल्याचे आढळले. त्यांनी ही बाब स्थानिक माध्यमांच्या लक्षात आणून दिली. याबाबतची बातमी वृत्तवाहिन्यांनी प्रसारीत केली होती. रावल यांनी या वृत्ताची दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget