(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईत गोवर रूबेला मोहिमेत ९० टक्के बालकांना लस - एकनाथ शिंदे | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबईत गोवर रूबेला मोहिमेत ९० टक्के बालकांना लस - एकनाथ शिंदे

मुंबई ( २५ जून २०१९ ) : गोवर रूबेला मोहीमेमध्ये मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ९० टक्के तर राज्यामध्ये ९६ टक्के बालकांना लस देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना ही लस देण्यात येणार असून, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, आयएपी/आयएमए, रोटरी क्लबचे सदस्य यांच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गोवर रूबेलाचे रूग्ण आढळून आले असल्याबाबतची लक्षवेधी सदस्य अमीन पटेल यांनी विधानसभेत मांडली होती. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोवर रूबेला मोहिमेत २२ लाख ६७ हजार ३६५ मुलांना म्हणजेच ९० टक्के मुलांना लसीकरण करण्यात आले. मोहिमेच्या सुरूवातीला अल्पसंख्याक बहुल विभागातील शाळेत नकार देणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीय होती. परंतु, वारंवार पालक सभा घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांशी, धार्मिक व राजकीय नेत्यांशी संवाद साधून मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक तसेच इंग्रजी वृत्तपत्रात सदर मोहिमेची जाहिरात, रेल्वे गाड्यांवरती जाहिरात, रेडिओ वाहिनीवरून कार्यक्रम प्रसिद्धी, रेल्वे फ्लायओवर पुलावर जाहिरात पोस्टर, बॅनर्स आणि माहितीपत्रके याद्वारे प्रसिद्धी करण्यात आली. उर्वरित १० टक्के बालकांनाही ही लस देण्यासाठी मोहीम सुरू असून, गोवर-रूबेलामुळे एकही बालक मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सदस्य भारत भालके यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget