(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नागपूर सुतगिरणी कामगारांच्या वेतनप्रश्नी त्वरीत कार्यवाही करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या
" />

नागपूर सुतगिरणी कामगारांच्या वेतनप्रश्नी त्वरीत कार्यवाही करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( २८ जून २०१९ ) : नागपूर विणकर सहकारी सुतगिरणीच्या कामगारांच्या थकीत वेतन तसेच हातमाग महामंडळाकडून देय निधीबाबत लवकरात लवकर आणि त्यामध्ये कामगारांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सुतगिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधान भवन येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सुतगिरणीच्या कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. यावर कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत तसेच महामंडळाकडून देय वेतन आयोग लाभ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये कामगारांचे हित लक्षात घेऊन महामंडळाने कार्यवाही करावी व पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीस पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव एच. के. गोविंदराज, तसेच सूतगिरणी कामगारांचे शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget