ठाण्यातील धोकादायक इमारतींसाठी तांत्रिक सल्लागार समिती स्थापणार - योगेश सागर

मुंबई ( २५ जून २०१९ ) : ठाणे येथील धोकादायक इमारतींसंदर्भात तज्ज्ञांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. मुंबईमध्ये धोकादायक ईमारतींसाठी तांत्रिक सल्लागार समिती आहे त्याप्रमाणे ठाणे येथेही सल्लागार समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली.

विधानसभेत ठाणे महानगरपालिकेतील धोकादायक इमारतींबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना सागर बोलत होते.

सागर म्हणाले, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतीस स्ट्रक्चरल ऑडीटनुसार रहिवास परवानगीसह दुरूस्तीस परवानगी देण्यात आली आहे. गांधीनगर येथील तळ एक इमारतीचा काही भाग कोसळल्याने सदर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेने दिल्या आहेत. तसेच, सी वन प्रवर्गातील १०३ इमारतींपैकी ८२ इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत व यापैकी ८ इमारती तोडण्यात आल्या असल्याची माहितीही सागर यांनी यावेळी दिली.

तसेच, शासनास क्लस्टर डेव्हलपमेंट करावयाचा अधिकार नाही तो मालक आणि सोसायटीने घ्यावयाचा निर्णय आहे. मात्र, धोकादायक इमारतींचा विकास मालक करत नसेल तर त्याबाबत भाडोत्रींना तसे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ज्या इमारती निष्कासित करावयाच्या आहेत त्यातील रहिवाशांना राहण्यासाठी गाळे देण्यात आले आहेत. पुढेही त्यांना गाळे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहितीही सागर यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री संजय केळकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget