मुंबईतील उमेदवारांसाठी 24 ते 28 जून पर्यंत होमगार्ड भरती

मुंबई ( २१ जून २०१९ ) : बृहन्मुंबई जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुंबई होमगार्ड दलाच्या वतीने येत्या 24 ते 28 जून 2019 या कालावधीत नवीन सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. घाटकोपरमधील पंतनगर येथील पोलीस मुख्यालय, लोहमार्ग कवायत मैदानात सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत ही नोंदणी होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी नोंदणीस येताना सर्व कागदपत्रांची मूळ व छायांकित प्रत, चार छायाचित्रे आणावीत. या नोंदणीसाठी उमेदवार बृहन्मुंबई जिल्ह्यातील रहिवासी असावा. दहावी उत्तीर्ण असावा, वय 20 ते 50 वर्षे, पुरुष उमेदवारांची उंची 162 से.मी., छाती न फुगवत कमीत कमी 76 से.मी. व 5 सेंमी. फुगली पाहिजे. तर महिला उमेदवारांची उंची 150 सें.मी. असावी. यावेळी धावण्याचा व गोळाफेक करण्याची मैदानी चाचणी देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या पात्र असावा. अधिक माहितीसाठी 22842423 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई होमगार्डचे समादेशक तथा पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget