(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा प्रश्नोत्तरे : क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाचे प्रयत्न - एकनाथ शिंदे | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानसभा प्रश्नोत्तरे : क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाचे प्रयत्न - एकनाथ शिंदे

मुंबई ( २१ जून २०१९ ) : क्षयरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी जीत प्रकल्प राबविण्यात येत आहे. रूग्ण उपचारासाठी प्रतिसाद देत नसल्याने जनजागृती कार्यक्रम शासन राबवीत आहे. क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आज विधानसभेत वाढत्या क्षयरोग रूग्णांबाबत प्रश्न मिलिंद माने यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, क्षयरूग्णांनी उपचार करावेत यासाठी प्रबोधन करण्यात येते. रूग्ण शोधण्यासाठी, उपचारासाठी, उपचाराअन्ती प्रत्येक ५००/- रूपए निधी देण्यात येतो. धान्यही पुरविण्यात येते. औषधासाठीही निधी पुरविण्यात येतो. प्रतिबंधात्मक मात्राही देण्यात येते. रँली, पोस्टर, बँनर, पथनाट्य या मार्फ़त जनजागृती करण्यात येत आहे. यारूग्णांचे प्रमाण शुन्यावर येईपर्यंत शासन प्रयत्न करेल.

यावेळी सदस्य सर्वश्री डॉ. राजेंद्र पटणी, अतुल भातखळकर यांनी चर्चेत भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget