हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंता जबाबदार - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 25 : राज्यात 48 लाख 25 हजार मीटर उपलब्ध असून यापुढे मीटरचा तुटवडा भासणार नाही. हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याला सहाय्यक अभियंता जबाबदार असेल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मीटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यासंदर्भात सदस्य किसन कथोरे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना बावनकुळे बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, सध्या ४८ लाख २५ हजार मीटर उपलब्ध असून, यापुढे मीटरचा तुटवडा भासणार नाही. यापैकी २४.६१ लक्ष नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आलेला आहे व उर्वरित २३.३९ लक्ष मीटरचा पुरवठा दर महिना सरासरी ४ लक्ष या प्रमाणे करण्यात येत आहे.

मीटर उपलब्ध असताना ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच तांत्रिक कारणाशिवाय किंवा हलगर्जीपणामुळे फीडर बंद होऊन वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्याला जबाबदार ठरविण्यात येऊन ही बाब संबंधित अभियंताच्या वेतनवाढीस जोडली जाईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री संदिप नाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर आदींनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget