सामाजिक समतेसाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी - सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

मुंबई ( २६ जून २०१९ ) : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे झाला. त्यावेळी खाडे बोलत होते.

शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण आपल्या संस्थानात राबविले. तसेच उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी संस्थानात विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश विश्वाला दिला. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समता तसेच सामाजिक सुधारणासाठीही विशेष कार्य केले, असे खाडे यांनी सांगितले.

शाहू महाराजांच्या जीवनातील विविध घटना, घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अभिनेते व इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर यांनी प्रयत्न करावेत. त्यांना या कामी शासन पूर्णपणे सहकार्य करील, अशी ग्वाही खाडे यांनी दिली.

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, गौतम चाबुकस्वार, सुभाष साबणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget