संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनीघेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट

मुंबई ( १६ जून २०१९ ) : सोमवार पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-4 या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण,छगन भुजबळ, नसिम खान, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, अबु आझमी,जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विरोधी पक्षांचा कोणत्या विषयांचा आग्रह आहे, त्यासंदर्भात चर्चा केली. अधिवेशनाचे कामकाज जनतेचे अधिकाधिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरळीत चालविले जावे, असे आवाहन विरोधी पक्षनेत्यांना करण्यात आले. जनतेचे प्रश्न चर्चेतून सोडविण्याबाबत विरोधकांनी सहमती दर्शविली.विरोधी पक्षांना सोबत घेऊनच विधीमंडळाचे कामकाज यशस्वी होत असते त्यादृष्टीने आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले असून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज निश्चितच सुरळीत पार पडेल, असा विश्वासही संसदीय कार्यमंत्रीयांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget