(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्याला दिलासा देणारा अर्थसंकल्प - सहकार मंत्री सुभाष देशमुख | मराठी १ नंबर बातम्या
" />

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्याला दिलासा देणारा अर्थसंकल्प - सहकार मंत्री सुभाष देशमुख

मुंबई ( १८ जून २०१९ ) : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य कारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्पावर दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत 50.27 लाख खातेदारांसाठी 24 हजार 102 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेत खावटी कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक किंवा तत्सम कारणांमुळे या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकार कटिबद्ध असून शेवटच्या शेतकऱ्यांला लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget