विधानसभा प्रश्नोत्तरे : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे किनवट- भोकर राष्ट्रीय महामार्ग कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई ( २१ जून २०१९ ) : नांदेड जिल्ह्यातील किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग आणि कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट केलेल्या कंत्राटदारास नोटीस देण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे तसेच नवीन ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली.

आज विधानसभेत कोठारी-हिमायतनगर या रस्त्याच्या अपूर्ण कामासंदर्भात सदस्य प्रदीप नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते. पाटील म्हणाले, संबंधित कंत्राटदाराचे निलंबन हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच ठेकेदाराच्या देयकामधून दंडापोटी १.८२ कोटी इतकी रक्कम कपात करण्यात येईल. हा रस्ता पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार असून, पुढील नवीन ठेकेदारास लवकर काम देऊन हा रस्ता पूर्ण करण्यात येईल अशी माहितीही पाटील यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget