पेन टाकळी : प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन तत्काळ करावे - सुभाष देशमुख

मुंबई ( ८ जुलै २०१९ ) : बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न लवकर सोडवावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

आज मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, महिला व बालकल्याण समिती जिल्हा बुलढाणा सभापती श्वेता महाले, संबंधित अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

या प्रकल्पग्रस्तांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या पुनर्वसन संदर्भात काय करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा विषय लवकर मार्गी लावून गावकऱ्यांचा प्रश्न लवकर सोडवावा. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील असे आश्वासन गावकऱ्यांना यावेळी देशमुख यांनी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget