मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा मतदारांनी लाभ घ्यावा

यवतमाळ ( २७ जुलै २०१९ ) : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 78- यवतमाळ विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 15 ते 30 जुलै 2019 पर्यंत राबविण्याचे निर्देश दिले आहे.

मतदारांसाठी विशेष मोहीम यापूर्वी 20 व 27 जुलै रोजी घेण्यात आली. तसेच ही मोहीम रविवार दिनांक 28 जुलै 2019 रोजी मतदान केंद्रावर राबविण्यात येत असल्याने सदर मोहिमेच्या कामाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. सदर नियुक्ती कर्मचारी हे मतदारांचे दावे हरकती प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर स्विकारणार आहे. तरी मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget