विधानपरिषद निवडणूकीसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष

औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघ

मुंबई ( २६ जुलै २०१९ ) : विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक 26 ऑगस्ट, 2019 आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

हा नियंत्रण कक्ष मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या कार्यालयामार्फत स्थापन करण्यात आला असून दि. 26 ऑगस्ट, 2019 पर्यंत कार्यरत राहणार आहे. कक्ष क्रमांक 611, सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे 24x7 तत्वावर हा कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.022-22025059 असा आहे. या निवडणुकीविषयी काही तक्रार दाखल करावयाची असल्यास नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्क साधता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget