मुंबई ( ८ जुलै २०१९ ) : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात ९ टक्क्यांहून १२ टक्के इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आज वित्त विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केल्याचे सांगून ते म्हणाले की, १ जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०१९ पासून रोखीने देण्यात येईल तर १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केले जातील असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा