आधारवाडी कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई ( ८ जुलै २०१९ ) : आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सक्त सूचना देऊन, या डेपोला पर्यायी बारवे व उंबर्डे येथील कचरा डेपो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

आधारवाडी कचरा डेपोच्या समस्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री शासकीय अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, आमदार नरेंद्र पवार, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह आधारवाडी परिसरातील विविध स्वयंसेवी संघटना व नागरिक यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधारवाडी कचरा डेपो बंद करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा. त्यासाठी उंबर्डे व बारावे येथील कचरा डेपो सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. तसेच डेपोमध्ये कमीत कमी कचरा जावा, यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभी करावी.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget