(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानगाथा पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानगाथा पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. ३० : माजी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधीमंडळाच्या कामकाजाचे हॅण्डबुक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.

विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पाटील लिखित विधानगाथा या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सर्वश्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पाटील यांनी सलग 10 वर्षे संसदीय कार्य मंत्री म्हणून काम केले. त्यांनी विधानगाथा या पुस्तकातून प्रत्यक्ष आपले अनुभव मांडले आहेत. विधानमंडळाची रचना, नियम, कार्यपद्धती याबाबतची सर्वांगीण माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे. ज्यांना विधानमंडळाच्या कामामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. संसदीय कार्य मंत्री म्हणून पाटील यांची कुठल्याही प्रसंगातून मार्ग काढण्याची वेगळी हातोटी होती. सर्व सदस्यांना सोबत घेऊन पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विधेयके मंजूर करुन घेतली. याबाबतही फडणवीस यांनी पाटील यांचे कौतुक करुन यापुढेही विविध विषयांवर चांगली पुस्तके लिहून समाजप्रबोधनाचे कार्य करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

नव्याने विधीमंडळात सदस्य म्हणून येणाऱ्यांसाठी विधानगाथा हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे म्हणून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

सलग 10 वर्षे संसदीय कार्य मंत्री म्हणून कार्य केल्यानंतर विधानगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून एक वेगळा विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे मनोगत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री सर्वश्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget