पोलिसांच्या बांधकामासंदर्भातील कामे त्वरीत मार्गी लावावी - गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

मुंबई ( ३ जुलै २०१९ ) : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळ यांच्यामार्फत हाती घेण्यात आलेल्या अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील गृह (पोलीस) विभागाच्या बांधकामासंदर्भातील कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. असे निर्देश गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळ यांच्यामार्फत हाती घेण्यात आलेल्या अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील गृह (पोलीस) विभागाच्या कामाबाबत आज राज्यमंत्री यांच्या दालनात बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अप्पर पोलीस महासंचालक एस जगन्नाथन, सहायक पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील हाती घेतलेली बांधकाम संदर्भातील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही डॉ.पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस हौसिंग बोर्डामार्फत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात निविदा काढण्यात आलेली कामे, नियोजन स्तरावर निविदासाठी प्रलंबित कामे तसेच आगामी काळात ज्या कामासाठी निविदा प्रस्तावित आहेत, इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रत्यक्ष प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget