(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अरुणा प्रकल्पाचे काम गतीने सुरू - गिरीष महाजन | मराठी १ नंबर बातम्या
" />

अरुणा प्रकल्पाचे काम गतीने सुरू - गिरीष महाजनमुंबई ( १ जुलै २०१९ ) : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे वैभववाडी (ता. सिंधुदूर्ग) येथील अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला गती आली असून यावर्षी 48 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. या धरणाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

सदस्य सर्वश्री वैभव नाईक, सत्यजीत पाटील- सरुडकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, 2005 मध्ये मान्यता दिलेला हा प्रकल्प विविध कारणांनी रखडला होता. त्याला 2015 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट केल्यामुळे कामाला गती मिळाली. यावर्षी प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली असली असून विक्रमी 45 लक्ष घनमीटर मातीकाम करण्यात आले आहे. सांडव्याचे काम 40 टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहे.

एका मुद्द्याला उत्तर देताना महाजन म्हणाले की, बांधकामाची गुणवत्ता नियमानुसार नियमितपणे तपासण्‍यात येत असून काम सर्व मानकांनुसार सुरू आहे. तसेच प्रकल्पाची भाववाढ ही प्रकल्पाला लागलेल्या विलंबामुळे आणि दरसूचित झालेल्या वाढीमुळे झाली आहे.

या प्रकल्पामुळे 244 घरे बाधित झाली होती. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असून स्थलांतराचे कामही पूर्ण होत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget