शालेय विद्यार्थ्यांमधील व्यसनाबाबत शासन गंभीर - जयकुमार रावल
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : शालेय विद्यार्थ्यांमधील व्यसनांविषयी शासन गंभीर असून राज्यातील 16 हजार शाळांना तंबाखूमुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

राज्यातील विद्यालये व महाविद्यालयांच्या परिसरात उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री व व्यसनांच्या अनुषंगाने सदस्य कॅप्टन आर. तमीळ सेल्वन यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थांविषयीच्या कोटपा कायद्याची गृह विभाग तसेच महानगरपालिकांच्या समन्वयातून अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात या कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट करुन घेण्यात येईल. शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ तसेच नशेच्या पदार्थांची विक्री याबाबत कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रशांत ठाकूर, अजित पवार, दिपीका चौधरी यांनीही सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget