नळपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा विचार करु - बबनराव लोणीकरविधानसभा/तारांकित प्रश्न

मुंबई ( १ जुलै २०१९ ) : मुख्यमंत्री पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला असून राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, जिल्हा परिषद आदींच्या नळपाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, कोर्टी, बोरगाव व कव्हे (ता. करमाळा) या चार गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर स्वयंचलित करण्याबाबत सदस्य नारायण पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पाणीपुरवठा योजनांना सौरऊर्जेवर चालविताना काही वेळा कमी सौरप्रकाशाची उपलब्धता लक्षात घेऊन दिवसा सौरऊर्जेवर तर रात्री महावितरणच्या वीजेवर चालविण्याचा पर्याय अवलंबण्यात येईल. सौर पंप बसविल्यानंतर या संयंत्रांची पुढील पाच वर्षाची दुरूस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर टाकण्यात येईल.

त्यांनी पुढे सांगितले, सौर पॅनेलसाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील जागा लक्षात घेता त्यासाठी उपलब्धतेनुसार शासकीय जागा देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. दरम्यान करमाळा तालुक्यातील या चार गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा सौरऊर्जेवर करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून विशेष पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत सूचना दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सुभाष साबणे, अजित पवार, सुनील केदार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, पृथ्वीराज चव्हाण यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget