सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

मेजर खडसे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक 15 ऑगस्ट 2018 रोजी प्रदान करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 12 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 6 लाख रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 6 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget