वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी योग्य ती सर्व खबरदारी – मदन येरावार
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : नाशिक शहारातील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ऊर्जा विभागाने सर्व खबरदारी घेतली आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वीची निगा व दुरुस्तीची कामे महावितरण कंपनीमार्फत एप्रिल व मे २०१९ मध्ये करण्यात आली असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी नाशिक शहरातील वीजपुरवठ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना येरावार बोलत होते. नाशिक शहरात आठ व नऊ जून रोजी जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाला. यानंतर शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व ईतर वर्गवारीतील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र त्यानंतर ऊर्जा विभागाच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे येरावार यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget