पन्नास टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्येच्या गावांचा ‘पेसा’मध्ये समावेश करण्यासाठी जलद कार्यवाही करु - अशोक उईके


विधानसभा/लक्षवेधी

मुंबई ( १ जुलै २०१९ ) : पन्नास टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या व आदिवासी उपयोजना क्षेत्रास भौगोलिकदृष्ट्या संलग्न असलेल्या गावांचा समावेश ‘पेसा’ कायद्यांतर्गत करण्याच्या अनुषंगाने जलद गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.

पेसा अंतर्गत समावेश न झालेल्या साक्री (जि. धुळे) तालुक्यातील गावांचा पेसामध्ये समावेश करण्याची मागणी सदस्य डी. एस. अहिरे यांनी लक्षवेधी सूचनेनुसार केली. त्याला उत्तर देताना उईके बोलत होते. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य अजित पवार यांनीही सहभाग घेतला.

उईके यांनी सभागृहाला माहिती दिली की, साक्री तालुक्यातील पेसा कायद्यांतर्गत समावेश करण्याची मागणी करण्यात आलेल्या 101 गावांपैकी 42 गावे जनगणना 2011 च्या यादीत आढळून आली नाहीत. त्यामुळे ही गावे पेसामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव करता आलेला नाही. या गावांना सेन्सस कोड मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उर्वरित पैकी 1 गाव सध्या अनुसूचित क्षेत्रामध्ये समावष्टि असून 58 गावांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त आहे. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. राज्यपालांकडे पाठविण्यात आलेले गावांचा पेसामध्ये समाविष्ट करण्याबाबतचे आदिवासी सल्लागार समितीचे प्रस्ताव लवकरात लवकर निर्णय होण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget