(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्याचे काम उल्लेखनीय - बबनराव लोणीकर | मराठी १ नंबर बातम्या
" />

स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्याचे काम उल्लेखनीय - बबनराव लोणीकर

मुंबई ( ९ जुलै २०१९ ) : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयच्यावतीने देशभर घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत (ग्रामीण) कोल्हापूर जिल्ह्याने देशातून दुसरा क्रमांक पटकविला असून राज्याच्या श्रेणीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेची प्रभावी अंमलबाजावणी करण्यात आली होती. स्वच्छतेच्या बाबतीत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात ही सुविधा पोहोचल्या असल्याने नागरिकांचे परिवर्तन झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्याचे काम उल्लेखनीय असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

आज मंत्रालयात स्वच्छता पुरस्कार मिळाल्याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यावेळी लोणीकर बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव अभय महाजन, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक राहूल साकोरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोणीकर म्हणाले, केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने 1 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभरातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेची प्रभावी अंमलबाजावणी करण्यात आली. यामोहिमेअंतर्गत राज्यात 26 लाख 48 हजार 26 शौचालये रंगविण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्याने साडेचार लाख शौचालय स्वच्छ सुंदर करून दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील सात जिल्हांमध्ये सातारा जिल्ह्याने विशेष पुरस्कारात महाराष्ट्राची मान देशात उंचविल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget