आयटीआय मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी - कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर


विधान परिषद/लक्षवेधी

मुंबई ( २ जुलै २०१९ ) : राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणी समिती गठित करण्यात आली होती. आता या प्रकरणी ही चौकशी एसीबी कडे सोपविण्यात येत आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत अहवाल प्राप्त करून यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लक्षवेधी सूचनेचा उत्तरात दिली.

आवश्यकता नसतानाही बऱ्याच आयटीआयमध्ये 50 कोटीचे टूल्स खरेदी तसेच अन्य बाबीतही भ्रष्टाचार झाला असल्याबाबत सदस्य ना.गो.गाणार, प्रा.अनिल सोले यांनी प्रश्न विचारला, त्यास पाटील यांनी उत्तर दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget