पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गँस व शिधापत्रिका वाटप

नागपूर ( २८ जुलै २०१९ ) : पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पात्र लाभार्थींना गँस जोडणी तर दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदयद्वारे शिधापत्रिका वितरीत करण्यात आले. गँस जोडणी व शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'रामगिरी' येथे पार पडला.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर उपस्थित होते.

शिवणगाव येथील देवकाबाई तुळशीराम मेश्राम आणि सोनाली संजय टोम्पे यांना गँस जोडणी देण्यात आली. तर योगिता राजू डोंगरे, भावना शैलेश मानकर आणि आनंदा शिवराम चामटे हे दिव्यांग अंत्योदय अंतर्गत शिधापत्रिकेचे लाभार्थी होते. यावेळी जिल्हा पुरवठा विभागाचे अनिल सवई, अर्चना निमजे, प्रियंका सोनकुसळे, अनिता वानखडे आणि किशोर टालाटुले उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget