प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई ( १६ ऑगस्ट २०१९) : माजी सैनिक/ विधवांचे पाल्य/ विधवा यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. सन 2019-20 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता 12 वी/पदवी/पदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60 % पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन मान्यताप्राप्त व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2019-20 मध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांची/विधवांचे पाल्य/ विधवा यांच्यासाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेबाबत नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक बोर्ड (www.ksb.gov.in) वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात असून या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्याकडून देशातून प्राप्त झालेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांना त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांनुक्रमे/कॅटेगरी नुसार एकूण 5500 पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. यामध्ये मुले आणि मुलीं यांना प्रत्येकी समान 2750 शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना 30,000 रुपये आणि मुलींना 36,000 रुपये प्रतीवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते.

सदर शिष्यवृत्तीसाठी अधिकृत अभ्यासक्रमाची यादी तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्या वेबपोर्टलवर www.ksb.gov.in उपलब्ध आहे. पात्र असलेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांनी दिनांक 15 नोव्हेंबर 2019 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget