बालशक्ती, बालकल्याण पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई ( १६ ऑगस्ट २०१९) : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. 2019 च्या या पुरस्काराकरिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करण्याची पात्रता पुढीलप्रमाणे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे, त्यांना बालशक्ती पुरस्कार दिला जातो. तसेच बालकल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारामध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानवसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस बालकल्याण पुरस्कार दिला जातो. तसेच संस्थास्तरावर हा पुरस्कार बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला दिला जातो. संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. संस्था बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी संस्था असावी.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget