राज्यमंत्री रणजित पाटील यांची सहृदयता एक महिन्याचे वेतन दिले पूरग्रस्तांसाठी

मुंबई ( ९ ऑगस्ट २०१९) : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गृह (शहरे), विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकणातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या स्थितीत प्रशासन मदत व बचाव कार्य करीत आहेत. समाजातील विविध घटक आपापल्या परीने मदत व बचाव कार्यात योगदान देत आहेत. डॉ. रणजित पाटील यांनीही आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केले असून तसे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवांना दिले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget