देहू आळंदी, पंढरपूर - पालखीतळ विकासासाठी ४८ कोटी; भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७ कोटींचा निधी

मुंबई ( २६ ऑगस्ट २०१९) : श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने १४२७.८५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्यातील सन २०१९-२० मधील कामांसाठी पुणे विभागीय आयुक्त यांना ४८ कोटी ९ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ते म्हणाले, यावर्षी या आराखड्यासाठी ८० कोटी ३५ लाख रुपयांची वित्तीय तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली होती. त्यापैकी ४८ कोटी ९ लाख ९४ हजार रुपयांचा निधी शासनाने वितरित केला आहे.

याप्रमाणेच शासनाने १४८.३७ कोटी रुपयांचा श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडाही मंजूर केला आहे. या आराखड्यातील चालू वित्तीय वर्षातील कामे करण्यासाठी अर्थसंकल्पित ४५ कोटी रुपयांपैकी २७ कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरित केला आहे.


या दोन्ही तीर्थक्षेत्र विकासाचे निधी वितरणाचे शासन आदेश दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी नियोजन विभागाने निर्गमित केल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget