शिरपूर येथील कारखान्याच्या आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत

मुंबई, दि. 31 : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

शिरपूरजवळील औद्योगिक वसाहतीतील रसायन कारखान्यात झालेल्या स्फोटात काही कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या संदर्भात सुरु असलेल्या मदतकार्याचा मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेत आहेत. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्य आपत्ती निवारण दल घटनास्थळी उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget