शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार

मुंबई ( २६ ऑगस्ट २०१९) : आझाद मैदानात मोर्चा काढणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १० ते १५ शिक्षक जखमी झाले.

आज दुपारी आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो मोर्चेकऱ्यांनी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केला. अचानक झालेल्या लाठीमारामुळे मोर्चेकऱ्यांची एकच धावपळ उडाली आणि आझाद मैदानात गोंधळ उडाला. त्यात १० ते १५ शिक्षक जखमी झाले.

उद्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक असल्याने या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न तातडीने घेऊन त्यावर तोडगा काढण्यात यावा, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.

शिक्षकांच्या मागण्या

इतर शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांनाही समान कामाप्रमाणे समान वेतन देण्यात यावे.
मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १९ वर्षांपासून अनुदान सुरू केलेले नाही, त्यांचं अनुदान सुरू करावे.

तसेच ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना २०% अनुदान सुरू केले,त्यांना नियमानुसार १००% अनुदान द्यावे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊन कर्तव्यात चालढकल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget