बोरिवलीच्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात 155 उमेदवारांना नोकरी

शासनाच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्यावी - उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई ( १९ ऑगस्ट २०१९) : उद्योग उभारण्यासाठी राज्य शासन उद्योगांना वीज, पाणी, भूखंड उपलब्ध करून देते. मैत्री व्यासपीठाद्वारे एका छताखाली सर्व परवाने मिळण्याची देखील सोय केलेली आहे. तेव्हा कंपन्यांनी राज्यातील स्थानिक मुलांना प्राधान्याने नोकरी देणे आवश्यक आहे. मुलांनी देखील कंपन्यांना आवश्यक असलेले कौशल्य अवगत करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने बोरिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार विलास पोतनीस, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते.

यावेळी देसाई म्हणाले, राज्य शासनाच्या उद्योग विभागाने बोरिवली येथे घेतलेला हा बारावा रोजगार मेळावा आहे. आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांना तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. हजारो मुलांना नोकऱीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या मेळाव्यात सहभागी झालेल्या मुलांना देखील नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची तीन ते चार वेळा मुलाखती घेतल्या जातील. नोकरीची संधी मिळेपर्यंत मुलांनी कंपन्यांकडे पाठपुरावा करावा. नोंदणी केलेल्या शेवटच्या मुलाला नोकरी मिळेपर्यंत उद्योग विभाग प्रयत्न करेल. ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचे राज्य शासनाने धोरण असल्याचे देसाई यांनी सांगितले.

बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी १३०० तरुण-तरुणींनी ऑनलाइन नोंदणी केली होती. तर २००० जणांनी ऑफलाइन नोंदणी केली. त्यापैकी १२७५ जणांनी मुलाखती दिल्या. ८६८ जणांच्या प्राथमिक मुलाखती झाल्या. त्यातील १५५ जणांना ऑफर लेटर अदा करण्यात आले. एकूण ५२ कंपन्यांनी यात सहभाग नोंदविला. या भागात सुमारे सहा हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याचे उद्योग विभागाने स्पष्ट केले.

उद्योग विभाग, सी आय आय आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर या मेळाव्याचे आयोजक होते. या मेळाव्याला सर्वसाधारण पदवीधर, आयटीआय,अभियांत्रिकी,माहिती तंत्रज्ञान, या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी हजेरी लावली होती. महिला उमेदवारांनीही या मेळाव्याला बहुसंख्येने प्रतिसाद दिला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget