पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परिक्षा मार्गदर्शन



 

            मुंबई, दि. 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या दरम्यान यु टयुब चॅनलवर  Barti Online व्दारे एमपीएससी पूर्व  परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणा दरम्यान एमपीएससी पूर्व  परीक्षेतील विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले होते. 

            18 मार्च 2021 पासून एमपीएससी मुख्य (Mains) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गामध्ये एमपीएससी मुख्य परीक्षेस आवश्यक उर्वरित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. तरी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी, पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई- बार्टी ॲपमधील M-governance अंर्तगत ऑनलाईन एमपीएससी मुख्य (Mains) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज  या लिंकवर उपलब्ध आहे.

             या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 4 महिन्यांचा (जुलै 2021 पर्यंत) असेल व आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी कमी किंवा अधिक करण्यात येईल. मार्गदर्शन वर्ग सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 ते 4 या वेळेत आयोजित केले जातील. तसेच शनिवार, रविवार व शासकिय सुटयांच्या दिवशी बंद राहतील.  सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे फेसबुक पेज व बार्टीच्या Barti Online या यु टयुब चॅनल वरुन लाईव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येत आहे, असे बार्टीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget