महाराष्ट्रात निर्बंध 15 एप्रिल पर्यंत राहणार 

मुंबई27: राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा 15 एप्रिल पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

                  राज्यात 15 एप्रिल पर्यंत अगोदर लागू केलेले सर्व निर्बंध पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणेसोशल डिस्टन्स ठेवणेआदी सर्व आदेश पाळावे लागतील. कार्यालयात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल.  कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाच पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश 27 मार्च 2021 पासून लागू करण्यात आलेला असून 15 एप्रिल पर्यंत अंमलात असेल. याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

                  इतर निर्बंधांमध्ये सार्वजनिक उद्याने  व सागरी किनारे रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत बंद असतील. सामाजिकसांस्कृतिकराजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांना 15 एप्रिल पर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल 50 लोक तर अंतिम संस्कारासाठी 20 लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी 15 एप्रिल पर्यंत लागू असेल.

                  सर्व खाजगी कार्यालय आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून 50 टक्के उपस्थितीतीसह काम करतील. अशा ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि सार्वजनिक वापरासाठी सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागेल.

          सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे,मॉल्ससभागृहेउपाहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत बंद राहतील.  मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील. याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृहमॉलउपाहारगृहहॉटेल हे कोविड -19 ची साथ असे पर्यंत बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल.

0000

 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget