सुधार समिती अध्‍यक्ष पदी शिवसेनेचे सदानंद परब विजयी


मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सुधार समिती अध्‍यक्ष पदासाठी (२०२१-२०२२) आज (दिनांक ६ एप्रिल २०२१) पार पडलेल्‍या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब हे १३ मते मिळवून विजयी झाले आहेत. परब यांनी सलग तिसऱ्यांदा सुधार समिती अध्‍यक्ष होण्‍याचा बहुमान संपादन केला आहे.

महानगरपालिका मुख्‍यालयातील सभागृहात झालेल्‍या या निवडणुकीमध्‍ये परब यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार स्वप्ना विरेंद्र म्हात्रे (भाजप) यांना १० मते मिळाली. एकूण २६ सदस्‍यांपैकी २३ सदस्‍यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तर तीन जण तटस्‍थ राहिले. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले.

तत्‍पूर्वी, अर्ज माघारी घेण्‍याच्‍या मुदतीत आजमी मोहम्मद अश्रफ मोहम्मद अस्लम  (भा. रा. कॉंग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget