महानगरपालिकेच्‍या शिक्षण समिती अध्‍यक्ष पदी शिवसेनेच्‍या संध्‍या दोशी (सक्रे) विजयी



मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण समिती अध्‍यक्ष पदासाठी (२०२१-२०२२) आज (दिनांक ५ एप्रिल २०२१) पार पडलेल्‍या निवडणुकीत शिवसेनेच्‍या संध्‍या दोशी (सक्रे) या १३ मते मिळवून विजयी झाल्‍या आहेत.

महानगरपालिका मुख्‍यालयातील सभागृहात झालेल्‍या या निवडणुकीमध्‍ये संध्‍या दोशी यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार पंकज यादव (भाजप) यांना ९ मते मिळाली. एकूण सदस्‍यांपैकी २२ सदस्‍यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तर चार जण तटस्‍थ राहिले.

तत्‍पूर्वी, अर्ज माघारी घेण्‍याच्‍या मुदतीत आशा सुरेश कोपरकर (भा. रा. कॉंग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget