संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनेस्को) सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश



 *"युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म" च्या लोगोचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते अनावरण*

 

मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनेस्को) शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेत  सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश झाला असून मुंबई शहराला "युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म" ही ख्याती प्राप्त झाली आहे.

मुंबई शहराला प्राप्त झालेल्या "युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म" च्या लोगोचे अनावरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी पार पडले.

 याप्रसंगी व्यवसाय विकास खात्याच्या प्रमुख श्रीमती शशी बाला उपस्थित होत्या. 

       मुंबई शहर हे चित्रपटांचे माहेरघर आहे. या क्षेत्रात मुंबई शहराचा जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. चित्रपट निर्मितीत मुंबई शहर अग्रगण्य असून सर्वात मोठी चित्रपटनगरी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे.  

      बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टीचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच या संबंधित उद्योगांबाबत माहिती प्राप्त व्हावी याकरिता मराठी चित्रपट महामंडळ आणि व्हिसलिंग वुड्स यांच्या सहकार्याने माहितीपट व परिसंवाद आयोजित  करण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळात इतर सृजनशील शहरांसोबत सामंजस्य करार करण्याचे विचाराधीन आहे. 

युनेस्को अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये तसेच परिसंवादांमध्ये मुंबई शहराचा सक्रिय सहभाग आहे.

या सर्व उपक्रमाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका राज्य शासनाच्या चित्रनगरी, प्रोडूसर गिल्ड ऑफ इंडिया, चित्रपट जगतामधील दिग्गज मंडळी, संबंधित महामंडळे, शैक्षणिक संस्था यांच्यासोबत समन्वय साधत आहे.


******

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget