स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव चौथ्यांदा विजयी




मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ या वर्षाकरिता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (सोमवार, दिनांक ५ एप्रिल २०२१) झालेल्या निवडणुकीत यशवंत जाधव (शिवसेना) हे १४ मते मिळवून सलग चौथ्यांदा विजयी झाले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश्री राजेश शिरवडकर (भारतीय जनता पक्ष) यांना ०८ मते मिळाली.

स्थायी समितीच्या एकूण २७ सदस्यांपैकी २२ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. एक सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत आसिफ झकारिया (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी कामकाज पाहिले.

यशवंत जाधव यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आणि संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्यासह सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेता राखी जाधव, समाजवादी पार्टीचे गटनेते व आमदार रईस शेख तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सह आयुक्त आशुतोष सलील तसेच विविध नगरसेवक व नगरसेविका आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन निर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.

महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन करुन या दोन्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आल्या.
     
===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget