आज ( ४ मे २०२१ रोजी ) ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीच्या दुसऱया मात्रेसाठी निवडक शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर होणार लसीकरण




*१८ ते ४४ वर्ष वयोगटाचे लसीकरण सध्याच्या व्यवस्थेनुसार ५ केंद्रांवर राहणार सुरू*

मुंबई : कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निवडक शासकीय तसेच महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या मंगळवार दिनांक ४ मे २०२१ रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार आहे. मात्र उपलब्ध मर्यादीत लससाठा पाहता, फक्त दुसरी मात्रा (डोस) घेण्यासाठी येणाऱयांनाच लस देण्यात येणार आहे. कोविन ऍपमध्ये नोंदणी केलेल्या व थेट येणाऱया (वॉक इन) नागरिकांनाही यात लस देण्यात येईल. संबंधित केंद्रांची यादी अद्ययावत करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु असून ही यादी महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरुन व प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येत आहे.


दरम्यान,  १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, उद्यादेखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.

या ५ लसीकरण केंद्राची नावे पुढीलप्रमाणे:

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर) 

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.       

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget