देहविक्रय करणा-या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य वाटप




*देहविक्रय करणा-या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य वाटप*


*महापालिका क्षेत्रातील ४,५०० महिला व तृतीय पंथीयांना रेशन किटचे वाटप*


*अतिरिक्त मनपा आयुक्त भिडे व जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही*

..मुंबई :- 'कोविड १९' या साथरोगाने बाधित असलेल्यांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या लॉकडाऊन लागू आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक घटकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे आव्हानात्मक होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या नियोजन खात्याद्वारे विविध स्तरीय उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील देहविक्रय करणा-या महिला व तृतीय पंथीय यांना महिनाभर पुरेल एवढ्या अन्नधान्याचा समावेश असलेल्या रेशन किट वितरणाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे.

..

या उपक्रमाची सुरुवात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, स्थानिक नगरसेवक श्री. जावेद जुनेजा यांच्या विशेष उपस्थितीत ना. म. जोशी मार्गावरील सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळेत नुकतीच करण्यात आली. या उपक्रमातंर्गत विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या पुढाकाराने सुमारे ४ हजार ५०० इतक्या महिला व तृतीय पंथीयांना विविध दैनंदिन गरजानुरुप अन्नधान्याचा समावेश असलेले किटचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे यांनी या निमित्ताने दिली आहे.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरांमध्ये सुमारे ४ हजार ५०० इतक्या संख्येने देहविक्रय करणा-या महिला व तृतीय पंथीयांचे वास्तव्य आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात या महिला व तृतीय पंथीयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेऊन विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य किट वितरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या किटमध्ये तांदूळ, कणिक, साखर, चहा, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, मसुरीची डाळ, चणे, कांदे, बटाटे, खाद्यतेल, अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण इत्यादी बाबींचा समावेश आहे. गेल्यावर्षी देखील लॉकडाऊनच्या काळात याच पद्धतीने अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले होते, अशीही माहिती महानगरपालिकेच्या नियोजन खात्याद्वारे देण्यात आली आहे.  

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget