(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी | मराठी १ नंबर बातम्या
" />

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

 


मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन


मुंबईदि.  21 : - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाचत्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत  घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.


ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असतानावाघाने त्यांच्यावर केलेल्या ल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे.  वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget